पहा 'अप्सराचा' नवा लूक | Sonalee Kulkarni | Lokmat Marathi News | मराठी न्यूज चैनल

2021-09-13 0

पहा 'अप्सराचा' नवा लूक

प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री आपली भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी खास प्रयत्न करतात. कोणी वजन वाढवतं, कुणी वजन कमी करतं, कुणी सिक्स पॅक ऍब्ज करतात, तर कुणी आपल्या लुकवर लक्ष देतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी ‘हंपी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी स्पेशल हेअर कट केला आहे. तिच्या या हेअर कटने तिचा लुकच बदलला आहे. स्वरूप समर्थ एण्टरटेनमेन्टच्या योगेश निवफत्ती भालेराव आणि डिजिटल डिटॉक्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चौतन्य गिरीश अकोलकर यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचं लेखन आदिती मोघेनं, दिग्दर्शन प्रकाश कुंटेनं आणि सिनेमॅटोग्राफी अमलेंदू चौधरी यांची आहे. वेगळा लुक मिळाल्याने सोनालीही खूश होती. आजपर्यंत मी कधीच माझे केस इतके शॉर्ट केले नव्हते. त्यामुळे इतके शॉर्ट करावे असं वाटतही नव्हतं. माझ्या या भूमिकेसाठी केस शॉर्ट असावेत, ही प्रकाशचीच आयडिया होती. सोनालीचा आता हा नवा लूक लोकांना किती भावतोय यावर लक्ष केंद्रीकरणाचा विषय ठरेल.

Videos similaires